Saturday, August 22, 2015

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागोबा वाडी, केंद्र सेलू, ता. औसा, जिल्हा - लातूर

# शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागोबा वाडी, केंद्र सेलू, ता. औसा, जिल्हा - लातूर

# शाळेचे ब्रीदवाक्य - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,

# शाळेची स्थापना - १९९७

# यु - डायस कोड - २७२८०३१४४०१

# शाळेबद्दल खूप काही :-

१. लोकसहभागातून विद्यार्थी संगणक कक्ष, अभ्यासिकेसाठी ज्ञानसाधना सभागृहाची निर्मिती
२. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकवाट्यातून सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण
३. ग्रंथालय, वर्तमानपत्र वाचनाची विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सोय
४. ई-लर्निंगद्वारे शिक्षण - या वर्षीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु
५. विज्ञान प्रयोग शाळेतून विद्यार्थ्यांद्वारे प्रयोगाचे सादरीकरण
६. कवायत, लेझीम, सूर्यनमस्कार, योगाचे मैदानावर धडे
७. भाजीपाला, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
८. शैक्षणिक साहित्य व स्कूल ब्याग ठेवण्यासाठी कडाप्पा व ओट्याची सोय
९. नंदादीप प्रकल्पाची अंमलबजावणी
१०. मधल्या सुटीत, क्यारम, चेस खेळायची सोय
११. उत्कृष्ट परिपाठ, अर्धा तास सामान्य ज्ञानाची तयारी
१२. स्वच्छतागृह
 १३. लोकसहभागातून शाळेस तारेचे कुंपण
१४. शालेय परिसरात नियोजनबद्ध वृक्ष लागवड
१५. कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन
१६. १००% विद्यार्थ्यांना टाय, शूज, ओळखपत्राची सोय
१७. मुलांसाठी साहित्य
१८. लोकसहभागातून शाळेची दर्शनी कमान
१९. वनभोजन, भाजीबाजार, बचत बँक, इंटरनेट ची सोय
२०. एक तास वाचनाचा, अंधश्रद्धा निर्मुलन, शाळा आपल्या दारी, समाज वाचनालयाची सोय
२१. प्रश्नमंजुषा, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा, व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
२२. शैक्षणिक उठावांतर्गत १५०००० रुपये निधी जमा

# शाळेची यशोगाथा

# शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये ग्रामीण स्वयंमूल्यमापनात शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक

# शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ग्रामीण स्वयंमूल्यमापनात शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक

# शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये ग्रामीण स्वयंमूल्यमापनात शाळेचा तालुक्यात तृतीय क्रमांक

# शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणीत शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक

# शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती १०० टक्के निकाल, एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

# शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ईयत्ता ४ थी शिष्यवृत्ती १०० टक्के निकाल, २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

# शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक

# आमचे प्रेरणास्थान

१. केंद्र प्रमुख - श्री. मुगावे, एस. एस.
२. शि. वि. अ. - श्री कापसे आर. एल.
३. कें. मु. अ. - श्री. धावारे सर, आणि श्री दीपक चामे सर

# शिक्षकवृंद

१. श्री. सुरवसे आर. जी.

शिक्षण - एम. ए. बी. एड.
कार्य - अध्यापन, विविध स्तरावर साधनव्यक्ती म्हणून कार्य
पुरस्कार - तालुका शिक्षक पुरस्कार, व जिल्हा गुरु गौरव पुरस्कार
लेखन साहित्य - स्पर्धा परीक्षा,  'मराठी व्याकरण मार्गदर्शक' या पुस्तकाच्या ५ आवृत्त्या, विविध विषयांवर वृत्तपत्रातून लेखन

➖➖➖➖➖➖➖

२. श्रीमती देशमुख सी. एस.

शिक्षण - एम. ए. (इंग्रजी), डी. एड.
कार्य - अध्यापन, विविध स्तरावर साधन व्यक्ती म्हणून कार्य
पुरस्कार - तालुका, जिल्हा पुरस्कार प्राप्त
आवड - वाचन, लेखन, अध्यापन, शाळेचे नियोजन
लेखन साहित्य - शैक्षणिक विषयावर वृत्तपत्रातून लेखन

〰〰〰〰〰〰〰〰

# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,

# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार

# 'मराठी शाळांची माहिती' या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक - ५२

# फेसबुक पानाची लिंक – https://goo.gl/VubCbS

〰〰〰〰〰〰〰〰

फोटो













No comments:

Post a Comment